अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात.
जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेमकं किती वेळा जेवावे? तज्ज्ञांच्या मते, अन्न पौष्टीक असण्यासोबतच ते योग्य वेळी घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक जण आहाराची योग्य काळजी घेत नाही. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर हेल्दी जीवन जगायचं असेल तर, जेवण करण्याची पद्धत आणि दिवसभरात किती वेळा जेवावे? हे पाहा
वेट लॉससाठी मदत: आरोग्य तज्ज्ञ प्रियंका सोनी यांनी सांगितले की, दिवसभरात वेळोवेळी जेवण घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने आपली चयापचय बुस्ट होते. याशिवाय कॅलरीज बर्न करण्यासही मदत मिळते.
तीन वेळा अन्न खाणं टाळा: वजन कमी करायचे असेल तर दिवसातून तीन वेळा खाणे टाळा. त्याऐवजी, दिवसातून ५-६ वेळा छोटे मिल्स घ्या. यामुळे चयापचय बुस्ट होते. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो.
मधुमेहग्रस्त रुग्णांनी किती वेळा जेवावे: मधुमेहग्रस्त रुग्णांनी दिवसभरात ५-६ वेळा कमी प्रमाणात कमी खावे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…