आरोग्य

तिळाचे काही महत्वाचे औषधीय उपयोग

तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत होते. तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असते. याच्या तेलातील आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत. यात लोह, मॅग्नेशियम, मॅगनिज, तांबे, कॅल्शियम भरपुर प्रमाणात असते. जुन्या काळात बॅबिलॉन येथील स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकावे म्हणुन तीळापासून केलेला हलवा खात असत. तिळाचे तेल हे शरीरच्या मसाजसाठी व आरोग्यासाठी वापरतात. अभ्यंग व शिरोधारा या क्रियेसाठी याचा वापर आयुर्वेदात होतो. यात या तेलाला फारच महत्त्व आहे.

तिळाचे काही महत्वाचे औषधीय उपयोग

१) मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबट खावी.

२) जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी, जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.

३) दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून ते दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत, काळे तीळ नियमित चावून खाणाऱ्या लोकांना दातांचे विकार शक्यतो होत नाहीत.

४) तिळाच्या झाडाची पाने आणि मुळे यांचा काढा करून त्याने केस धुतल्यास काळेभोर आणि मुलायम होतात.

५) जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.

६) लघवीतून पु जात असेल तर तिळाचे सेवन उपयुक्त आहे. तीळ शरीरातील सर्व धातूंना बलदायी असल्याने अशा त्रासदायक विकारात तिळ अमृतासारखा आहे.

७) स्त्रियांना पाळीच्या वेळी वेदना होत असतील तर औषधांमध्ये तिळ वापरतात याने वेदना कमी होऊन पाळी सुकर होऊन जाते.

तिळाच्या तेलाने अभ्यंग

तिळाच्या तेलाने अभ्यंग करणे अत्यंत उपयुक्त असून त्याने त्वचेला आलेला कोरडेपणा निघून जातो. लकव्यासारख्या आजारात तीळ तेलाने नियमित मालिश केल्यास चांगला फरक दिसतो. हाडे मोडली असतील किंवा हाडे झिजली असतील तर तीळसेवन करणे हितकर आहे.

तीळ स्निग्ध असल्याने बाजरीच्या भाकरीला लावून खाण्याची मराठी लोकांची परंपरा अत्यंत उत्तम आहे . थंडीच्या काळात तीळ सेवन करणे अत्यंत हितकर आहे.

तीळ काळे, पांढरे व लाल अशा तीन वेगवगेळ्या रंगांत तीळ बघायला मिळतात. असे म्हणतात, की प्राचीन काळी सर्वप्रथम तिळातून तेल काढले गेले आणि म्हणून “तेल’ या शब्दाची व्युत्पत्ती “तिल’ (संस्कृत) या शब्दातून झाली आहे. आयुर्वेदशास्त्राने तिळ व तिळ तेलास दीर्घायुष्याचा लाभ देणारे आहारद्रव्य असे पुरस्कृत केले आहे. तिळाच्या अनेक गुणांमधील प्रमुख गुण म्हणजे ते बलदायक, वातनाशक, मातेचे दुग्धवर्धक असे आहे. तिळ हे केस, त्वचा व दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहेत. रोज मूठभर तिळ चावून चावून खाल्ल्यास दात खूपच बळकट होतात, असे काही जाणकार मानतात. विशेषत: शाळेतली मुले-मुली, तरुण व खेळांडूसाठी तिळ अत्यंत आरोग्यदायी आहेत. वयात येणाऱ्या बारीक मुलींना तिळ-गूळ नियमित स्वरूपात थंडीच्या दिवसांत खाण्यास द्यावे. यामुळे कुपोषण टळण्यास मदत होते. आधुनिक शास्त्रानुमते तिळ हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. सर्व तेलबियांमध्ये सर्वाधिक कॅल्शियम तिळामध्ये आहे. परंतु तिळातील ऑक्झेेलेट्‌स हे कॅल्शियम शरीराला मिळवून देण्यात अडथळा निर्माण करतात. तिळाचा वरचा स्तर काढून टाकल्याने किंवा तिळकूट केल्याने अथवा तिळ चांगले चावून चावून खाल्ल्याने हा कॅल्शियमच्या शोषणाचा अडथळा थोडा कमी करता येतो. थोडक्याचत असे, की तिळात भरपूर कॅल्शियम असले तरी या क्षाराच्या प्राप्तीसाठी निव्वळ तिळावर अवलंबून न राहता अन्नात वैविध्य राखावे. तिळामध्ये 46 टक्के फॅट्‌स आहेत, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ते उत्तम टॉनिक आहे. गव्हाच्या पिठात तिळकूट घालून रोजच्या आहारात तिळाचा समावेश करता येईल. तिळामध्ये हृदयरक्षक “इ’ जीवनसत्त्व आहे. एका शास्त्रीय पाहणीमध्ये तिळाचा हृदयरक्षक फायदा सिद्ध झाला आहे. तिळातील ऑलेथिक ऍसिड हे स्निधाम्ल वाईट कोलेस्टेरॉल कमी करते व चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. तिळातील अँटिऑक्सिीडंट्‌स रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलची मात्रा कमी करतात.

तिळामध्ये सिसॅमॉल, सिसॅमिनॉल हे अँटिऑक्सिडंट्‌स आहेत. शरीरातील बाधणारे घटक तिळ कमी करते.त्यामुळे कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते. तिळातील कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, मॅगेनिझ हे क्षार शरीराच्या स्नायूंच्या कार्याचे संतुलन राखण्यास मदत करतात, आणि म्हणूनच तीळ हे क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींना चांगलेच फायद्याचे आहेत. परंतु हे फायदे मिळण्यासाठी किमान मूठभर तीळ चांगले चावून चावून खाणे आवश्यक आहे किंवा तिळाचा कूट वापरावे. आहारात तिळ असल्यास पाणी भरपूर प्यावे लागते. तीळ हे हिवाळ्यात खाण्यास उत्तम आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

45 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

48 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

56 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

1 तास ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

1 तास ago