हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे काही घरगुती उपचार ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचा चांगली ठेवू शकाल.
थंडीत ओठांची अशी घ्या काळजी
फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं.
दिवसातून २-३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो.
१ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यास हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा.
ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नका. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते तसेच दुखापतही होऊ शकते.
ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे.
थंडीत अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते.
अनेकांच्या शरीराला क्रीम लावल्याने रिॲक्शनही येऊ शकते. त्यामुळे अशा क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…