आरोग्य

पिवळे दात चमकदार करण्यासाठी खास आयुर्वेदिक मंजन, तोंडाची दुर्गंधीही होईल दूर

वेगवेगळ्या कारणांनी पिवळे झालेले दात आणि श्वासांची दुर्गंधी यामुळे नक्कीच तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तसेच चारचौघात हसण्या आणि बोलण्याची समस्याही निर्माण होते. या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. पिवळे दात चमकदार करायचे असतील आणि श्वासांची दुर्गंधी दूर करायची असेल तर हे उपाय नॅचरल असल्याने यांचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत.

कडुलिंबाची फांदी किंवा पावडर

कडुलिंबाला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅं-इन्फ्लेमेटरी गुण असतात. अशात कडुलिंबाच्या फांदी दात घासल्यास किंवा कडूलिंबाच्या पानांपासून मंजन तयार करा. या मंजनाने नियमितपणे दात स्वच्छ करा. पिवळ्या दातांची आणि दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

रात्री लवंग चघळा

लवंग तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी फार प्रभावी उपाय आहे. यातील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे दातांची आणि तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होईल. यासाठी रात्री झोपण्याआधी एक लवंग चघळा किंवा लवंगाचं तेल पाण्यात टाकून या पाण्याने गुरळा करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

सैंधव मिठाने दात घासा

एक चमचा मोहरीच्या तेलात अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून दातांवर हलक्या हाताने घासा. याने पिवळे दात चमकदार होतील आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा येणार नाही.

हळद आणि खोबऱ्याचं तेल

हळद आणि खोबऱ्याचं तेलही तुमची पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. हे एक प्रभावी आयुर्वेदिक मंजन आहे. यासाठी एक चमचा खोबऱ्याच्या तेलात अर्धा चमचा हळद टाकून दातांवर बोटाच्या मदतीने घासा. नंतर कोमट पाण्याने गुरळा करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

पुदीन्याच्या पाण्याने गुरळा करा

पुदीन्याची ताजी पाने चावून खावीत किंवा पदीन्याचं तेल पाण्यात टाकून गुरळा करावा. याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल आणि दात चमकदारही होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago