आरोग्य

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

झोपेतून लवकर उठण्याचा फायदा:

ज्या लोकांमध्ये अनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये बॉडी क्लॉक संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे याचा मानसिक आरोग्य आणि आजारांशी कसा संबंध आहे.

मेंदुची क्षमता वाढते: सकाळी आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनची निर्मिती अधिक होत असते. या हार्मोनच्या मदतीने स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी झोपेतून लवकर उठल्याने दिवसभर आपलं शरीर तणावमुक्त राहतं. तसेच सकाळी फ्रेश हवेत श्वास घेतल्याने मेंदुमध्ये रक्तसंचार वाढतो ज्यामुळे विचार करण्याची, समजण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक वाढते.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठल्याने स्वच्छ ऑक्सिजन मिळतं. यामुळे श्वासासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो आणि फफ्फुसंही चांगले राहतात.

सकाळी उठून व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे हृदय निरोगी राहतं.

अनेक मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसेच सकाळी उठून योग्याभ्यास करण्याचेही अनेक फायदे आहेत.

सकाळी लवकर उठल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं, यामुळे काम करण्यात अधिक लक्ष लागतं. म्हणजे कामही चांगलं होतं आणि आनंदही मिळतो.

सकाळी जबरदस्तीने उठण्याचे नुकसान

जेव्हा एखाद्याला जबरदस्तीने त्याच्या बॉडी क्लॉक विरूद्ध सकाळी लवकर उठण्यास किंवा जागण्यास सांगितलं जातं तेव्हा, याचाही वाइट प्रभाव पडतो. शरीरासोबत केलेली जबरदस्ती कधीही फायद्याची ठरत नाही. लोकांना त्यांच्या सिर्काडियन क्लॉक म्हणजेच शरीराच्या जैविक घड्याळीप्रमाणे सगळं करू दिलं, तर त्यांचं परफॉर्मंन्स चांगलं होतं. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्याला सकाळी लवकर उठण्यास सांगण्यात आलं तर त्याला आळस आलेला असेल. त्याचं कामात अजिबात लक्ष लागणार नाही. मेंदुचाही वापर तो चांगल्याप्रकारे करू शकणार नाही आणि अशात त्याचं वजन वाढू शकतं.

सकाळी झोपेतून लवकर उठण्यासाठी काय करावे

उशीरा झोपण्याची सवय बदला: रात्री उशीरा झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला तुम्हाला शक्य होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दूध घ्या. थोडं चला. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.

प्रयत्न सोडू नका: जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही, तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे. ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.

आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा: सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी झोपा व दुसऱ्या दिवशी १५ मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुसऱ्या दिवसापासून ३० मिनिटे आधी झोपा व ३० मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

दुपारी झोप घेण्याचे टाळा: कधीही दुपारी झोपू नका. कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही. दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टीत किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

1 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

1 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

3 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

22 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

22 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

22 तास ago