आरोग्य

मायग्रेन ची कारणे व उपचार

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात.

बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, अनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, वातावरणातील बदल, उच्च रक्तदाबाचा त्रास असणे किंवा काही औषधांच्या साईड इफेक्ट्स यासारख्या कारणांमुळे आजकाल मायग्रेनचा त्रास अनेकांना होत आहे.

मायग्रेनची कारणे 

मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत.

डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे,

पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे,

‎अपुरी झोप, जागरण करण्यामुळे,

काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे,

भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे,

डिहायड्रेशनमुळे,

हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात अनेक महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ लागतो.

प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हॉर्मोन्समधील बदलांमुळे,

मोठा गोंगाट कानावर ऐकू आल्यामुळे,

उग्र वास सहन न झाल्यामुळे,

मानसिक ताणतणावामुळे,

दररोजच्या प्रवासामुळे,

सिगारेट-तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनामुळे मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेनवर हे आहेत उपचार 

अर्धे डोके दुखणे यावर आपले डॉक्टर वेदनाशामक औषधे देतील. याशिवाय मळमळ व उलट्या थांबवण्यासाठीही काही औषधे ते देऊ शकतात. वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मायग्रेनवर उठसुठ वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे योग्य नाही.

यापेक्षा वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत. मायग्रेन डोकेदुखीच्या नेमक्या निदानासाठी MRI किंवा CT स्कॅन यासारख्या तपासण्या कराव्या लागू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

7 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

7 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

7 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

8 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

14 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

14 तास ago