बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या पद्धतीमुळेही अनेकदा छातीत जळजळ होऊ लागते.
काय आहे अॅसिड रिफ्लक्स
अॅसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्न पचनासंबंधी एक समस्या आहे. यात जे अॅसिड आपलं अन्न पचवण्यासाठी असतं, ते अन्ननलिकेतून आपल्या गळ्यापर्यंत येतं. ज्यामुळे जळजळ होऊ लागते.
अॅसिड रिफ्लक्सची लक्षणं
पोटातील अॅसिड गळ्यापर्यंत येणं
घशात आंबटपणा जाणवणं
छातीत किंवा गळ्यात जळजळ
अन्न गिळण्यास समस्या
छातीत किंवा घशात का होते जळजळ
आपण जे खातो ते अन्न पचवण्यासाठी पोटात काही अॅसिड रिलीज होता. जेव्हा अन्न अन्ननलिकेतून पोटाकडे जाऊ लागतं तेव्हा इसोफेजिअल स्फिंक्चर नावाचा एक वॉल्व उघडला जातो आणि अन्न पोटात पोहोचतं. जेव्हा अॅसिडचं प्रमाण अधिक असतं, तेव्हा ते अन्ननलिकेतून घशात परत येतं, ज्यामुळे हार्टबर्नची समस्या होते.
कसं झोपल्यानं होते समस्या
छातीत किंवा घशात जळजळ होत असेल तर याचा संबंध तुमच्या स्लीपिंग पोश्चरसोबतही आहे. जर तुम्ही रात्री पोट किंवा पाठीवर झोपत असाल तर यानं अॅसिड रिफ्लक्सची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, एका कुसेवर झोपावं. जेणेकरून ही समस्या होणार नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…