आरोग्य

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय चांगली की वाईट…

भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे माणूस बाहेर पडत नाही आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक, कारण अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण औषधोपचारासह स्वतःला गरमी देण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करतात. तर काही लोकं रात्री झोपण्यापूर्वी पांघरुण घेतात.

प्रत्येकाची पांघरूण घेण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, काहींना डोक्यावर पांघरुण घेऊन झोपण्याची सवय असते. त्यांना डोक्यावर पांघरुण घेतल्याशिवाय झोप लागत नाही. डोक्यावर पांघरुण घेतल्याने डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकले जाते. ही सवय आपल्याला नॉर्मल जरी वाटत असली तरी देखील आरोग्यासाठी ही सवय चांगली नाही. ही सवय आरोग्याच्याबाबतीत हानिकारक मानले जाते.

जर आपण अधिक काळासाठी पांघरुणाच्या आतमध्ये तोंड झाकून झोपत असाल तर, ही बाब आरोग्यासाठी चांगली नाही. याने अल्झायमर, डिमेंशिया, अथवा ह्रदयाच्या संबधित समस्या उद्भवू शकते, हे आजार त्वरित होतील असे नाही, मात्र आरोग्याची काळजी घेणं आवश्यक.”

अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंशाचा बळी ठरू शकतात…

रात्रभर पांघरुणाच्या आत चेहरा झाकून झोपल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचबरोबर पांघरुणाच्या आत वाढलेल्या उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अनेक रिसर्चजरच्या मते, रात्रभर पांघरुणाच्या आत तोंड झाकून झोपल्याने मानसिक आरोग्य बिघडते. जे दीर्घकाळ असे करतात त्यांना देखील अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंश सारखे गंभीर विस्मरणाचे आजार होऊ शकतात.

स्लीप एपनियाच्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक…

स्लीप एपनिया या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा लोकांचा श्वास झोपेत असताना अचानक बंद होतो आणि ते घाबरून जागे होतात. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी पांघरूणात चेहरा झाकून झोपणे प्राणघातक ठरु शकते. पांघरुणाच्या आत डोके झाकून झोपल्याने स्लीप एपनियाची समस्या वाढू शकते.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयच्या संबधित समस्या उद्भवू शकते…

आपल्या घरात जर एखाद्याला पांघरुणाच्या आत डोके ठेऊन झोपण्याची सवय असेल तर, आजच ही सवय किती घातक ठरू शकते यासंदर्भात सांगा. याने ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दमा किंवा हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

11 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

16 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

16 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

16 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

16 तास ago