आरोग्य

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.

झोपण्याची योग्य पद्धत:- चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.

निद्रानाशाचे परिणाम: निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे, डोके जड पडणे, शरीर जड पडणे, अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात. त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे. अपुरी झोप (गरजेपेक्षा कमी किंवा अयोग्य ) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.

शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे फायदे:

चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते, त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.

व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.

सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील डाग कमी होतात लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.

भूकेत सुधारणा होते पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.

कार्यक्षमतेत वाढ होते: ८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते.

अशा प्रकारे योग्य, व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच तर जेवण, व्यायाम, योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago