आरोग्य

अंगाला खाज येण्याची मुख्य कारणे

अंगाला खाज सुटते का?

आजकाल बदललेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे शरीराच्या इतर भागांचे जसे नुकसान होत आहे तसेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात ते त्वचेचे होत असते.

खाज येण्याची मुख्य कारणे

1) खाण्यामुळे:- आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा. काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात. उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते.

आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्‍हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्‍यांनो, सावधान तुमच्या अंगाला खाज सुटू शकते. आजकाल आम्हा भारतीयांच्या खाण्यातून काय जात नाही ते सांगा. कित्येक कारखाने आपले सांडपाणी नदीत टाकतात व त्या नदीचे पाणी नकळतपणे आम्ही पिण्यास वापरतो. नदीतील मासे आम्ही खातो.

२) वस्तूंमुळे:- आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. जसे -सिनथेटिक कपडे, कपाळावरील टिकली, साबण, नकली दागिने या सगळ्या गोष्टींनी अलेर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज निर्माण होते..

३) गोळ्या-औषधे:- काही जणांना काही particular गोळ्या-औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते. आपल्याला कोणत्या गोळयामुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.

४) त्वचेचे विकार:- त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, ऍलर्जी, लिकेन प्लेनस, डोक्यातील कोंडा, यासारखे असे अनेक त्वचाविकार आहेत ज्यामधे खाजेचा त्रास होतो

५) विविध रोग:- विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते. मधुमेही रुग्णांमध्ये हे दिसून येते. ज्यांना यकृताचे (लिव्हर) रोग आहेत त्यांनाही खाज येते. पोटात जंत झाले तरीही शरीरावर मोठाले चट्टे पडून खाज सुटते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

42 मिनिटे ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

47 मिनिटे ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

52 मिनिटे ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

1 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

1 तास ago

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…

1 तास ago