आरोग्य

लिंबू आणि कापराच्या मिश्रणाने दूर होतील या ५ समस्या

दाताचं दुखणं होईल दूर:- लिंबू आणि कापूर एकत्र करून लावल्याने दात दुखण्याची समस्या दूर करता येते. तसेच याने दातांना किडही लागत नाही. यासाठी लिंबाच्या रसात चिमूटभर कापूर टाकून दातांवर लावा. त्यानंतर पाण्याने गुपळा करा.

पोटासंबंधी समस्या:- लिंबू आणि कापराचं मिश्रण लावल्याने पोटासंबंधी समस्या दूर केल्या जाऊ शकतात. याने पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. याचा वापर करण्यासाठी लिंबाच्या रसात कापूर, ओवा आणि पदीन्याचा रस पाण्यात टाकून सेवन करा. याने फायदा मिळेल.

पायांची स्वच्छता:- पायांची टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू आणि कापराचं मिश्रण फायदेशीर ठरतं. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस आणि कापूर टाकून या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. नंतर साध्या पाण्याने पाय धुवावे. काही वेळ हा उपाय केल्याने पायांवरील टॅनिंग, पायांवरील मळ, माती दूर होईल.

केसगळती थांबेल:- लिंबू आणि कापराचं मिश्रण केसांवर लावल्याने कोंड्याची समस्या दूर करता येते. यात अ‍ॅंटी-डॅंड्रफ आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेलाही इन्फेक्शन होणार नाही. तसेच केसगळतीची समस्याही दूर होईल.

वजन होईल कमी:- शरीराचं वाढलेलं वजन वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि कापराचं वापर करू शकता. याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल, ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढेल. याचा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago