आरोग्य

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू कार्यान्वित होतात.

प्रत्येक स्नायूच्या आकुंचनाबरोबर स्नायूत असणारं रक्त नीलांमधून हृदयाकडे पाठवलं जातं. त्यामुळे हृदयाकडे येणार्‍या रक्ताचं प्रमाण बरंच वाढू लागतं. याचा परिणाम नाडीची व श्वसनाची गती वाढण्याकडे होतो. अशी वाढलेली गती हृदयाच्या स्नायूंना व्यायाम घडवते. असा व्यायाम दररोज अर्धा तास आठवड्यातले पाच दिवस केला तर रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन्ही संस्था अधिकाधिक कार्यक्षम होऊ शकतात.

दुसरीकडे अजिबात दमछाक न होता पण अधिक काळ काम करत राहता यावं, या उद्देशाने जे व्यायाम करता येतात, त्यात व्यायाम करताना नाडीची गती फारशी वाढण्याची आवश्यकता नसते. उलट ते संथ गतीने केले तरच ते दीर्घकाळ करता येतात. संथ चालताना स्नायूंवर, सांध्यांवर, पाठीच्या कण्यावर, श्वसनावर ताण येत नाही. स्नायूंना आपलं काम करण्यास लागणारी ऊर्जा प्राणवायूचा वापर करून मिळवता येते. चयापचयावरही ताण येत नाही. म्हणूनच असं सांगितलं जातं की, संथ गतीने आठवड्याला आठ ते दहा तास चालणं हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल…

9 तास ago

क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता…

9 तास ago

रायगडावरील गडकोटांचे पावित्र्य जपा; संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करा; एकनाथ शिंदे

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन…

9 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार; भाजप सरकारवर सपकाळांचा घणाघात!

“संविधान धोक्यात, लोकशाही वाचवणे ही काळाची गरज”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी ठाणे: भारतीय…

9 तास ago

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी…

12 तास ago

शिरूरमध्ये ‘पोलीस’ असल्याचा बनाव रचला, भामट्यांनी सोनं आणि रोख रकमेवर मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : 'पुढे पोलीस कारवाई व दंड करत आहेत, आम्हीही पोलीसच आहोत, तुमचे…

12 तास ago