आरोग्य

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात

दररोज सकाळी दोन ते तीन खजूर खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते ज्याममुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात खजूरचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य देखील निरेगी राहाते. वाढत्या वयासोबत हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांचं आरोग्य राखण्यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.

खजूरमध्ये भरपूर प्रमाणात मँगनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यासोबतच खजूरमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित समस्या होत नाहीत त्यासोबतच अॅसिडिटीच्या समस्या असल्यास दररोज सकाळी रिकाम्यापोटी खजूर खाणे फायदेशीर ठरेल.

खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच खजूरमध्ये मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समसस्या होऊ शकतात. खजूरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधिवाताचा त्रास दूर होतो. साधेवाताच्या रूग्णांसाठी खजूर खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अशा लोकांनी दररोज खजूर खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत करते. ज्या लोकांच्या शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची पातळी कमी असेल तर अशा लोकांनी खजूर खाणे फायदेशीर आहे. अशा लोकांनी खजूर खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते त्यासोबतच शरीरातील उर्जा वाढते.

खजूर खाण्याचे दुष्परिणाम

जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

खजूर जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते.

खजूर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या होऊ शकतात.

अॅलर्जी असलेल्या लोकांनी खजूरचे सेवन करू नये.

जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुम्हाला पिंपल्स सारख्या समस्या होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

18 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago