महाराष्ट्र

कोल्हापूरच्या राजचं आगमन ही गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता, संस्कृतीचा मोठा उत्सव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.

‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल सर्कल मंडळाला दिली आणि त्या माध्यमातूनच ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना प्रत्यक्षात सुरु झाली. आज (२० जुलै) ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉ. उदय सामंत सहभागी झाले. त्यांनी श्री गणरायाचं पूजन करुन दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले. यावेळी गोल सर्कल मंडळाच्यावतीने मंत्री डॉ. उदय सामंत यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित गणेशभक्तांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. “गणेशभक्तांची गर्दी पाहून समाधान वाटले. ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु करण्यात आला होता, तो उद्देश सार्थकी लागल्याचे पाहून मनोमन समाधान मिळाले. ” “कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव आहे”असे डॉ. सामंत यांनी सांगितले.

मंत्री डॉ. उदय सामंत यांच्याच पुढाकारातून पहिल्यांदा ‘रत्नागिरीचा राजा’ आणि त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरु करण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पुष्कराज क्षीरसागर, गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष गौरव यादव, सतीश नलगे, रूपेश बागल, गणेश पाटील, नेताजी पाटील, रूपेश पाटील, सचिन पाटील, भारत पन्हाळकर, शुभम लाड, आदित्य दाते, शिवम पोवार यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूरवासिय उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago