आरोग्य

स्वयंपाकघरातच आहेत पिगमेंटेशन कमी करणारे ३ पदार्थ, त्वचा होते उजळ-स्पॉटलेस

त्वचेच्या अनेक समस्यांपैकी पिगमेंटेशनची समस्या ही अनेकजणींना सतावते. त्वचेवरील पिगमेंटेशन म्हणजेच चेहऱ्यावर येणारे काळे डाग किंवा चट्टे, यामुळे आपले सौंदर्य बिघडू शकते. आपल्यापैकी अनेकजणींना कपाळ, डोळ्यांकडील भाग, गाल, हनुवटी अशा वेगवेगळ्या भागांवर पिगमेंटेशन येते. आपल्या त्वचेवरील पिगमेंटेशनचे काळे डाग आणि चट्टे घालवण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. पिगमेंटेशनची समस्या फारशी गंभीर नसली तरी वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या वाढू शकते.

कधीकधी हे डाग लहान असतात तर कधीकधी ते संपूर्ण चेहऱ्यावर पसरतात. जर आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दिवसेंदिवस वाढत गेले तर चेहरा अधिकच खराब दिसू लागतो. पिगमेंटेशन घालवण्यासाठी अनेकजणी महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सपासून ते अनेक घरगुती उपायांपर्यंत सगळेच उपाय करुन पाहतात.

पिगमेंटेशनची समस्या होईल दूर…. 

१) बटाटा: बटाट्यामध्ये एक विशेष एंझाइम असते जे त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवण्यास आणि पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एक कच्चा बटाटा घ्या, त्याच्या पातळ चकत्या करा आणि त्वचेवरील पिगमेंटेशन असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळून लावा. बटाट्याचा रस त्या भागावर ५ मिनिटे तसाच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दररोज हा उपाय केल्यास त्वचा उजळते आणि पिगमेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत होते.

2) मसूर डाळ: मसूर डाळ फक्त खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील अतिशय फायदेशीर ठरते. मसूर डाळ त्वचेचा रंग सुधारण्यास, डेड स्किन काढून टाकण्यास आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. यासाठी एक कप मसूर डाळ रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर मास्कसारखी लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार होते. आठवड्यातून १ ते २ वेळा हे मिश्रण लावल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतील.

३) टोमॅटो: टोमॅटो हा त्वचेचा रंग उजळवण्याचा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अ‍ॅसिडिक घटक त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात. यासाठी टोमॅटोचा गर काढा आणि तो चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायाने त्वचा ताजी, स्वच्छ व उजळ होते. नियमित वापरल्यास पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेला नैसर्गिक चमक येते.

4) तांदुळाचे पीठ: पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तांदुळाचे पीठ आणि मध देखील उपयुक्त ठरु शकते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यातआधी एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ चमचे तांदळाचं पीठ घ्या. नंतर यात १ ते २ चमचे मध मिसळा. २ ते ३ चमचे दळलेले ओट्स घाला. हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्यावे. हे मिश्रण साधारण २० ते ३० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. या फेसपॅकच्या वापराने, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago