आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात, गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते.
1) खोबरेल तेल: खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील. आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावा.
2) आवळा: आवळ्याला मेंहदी मध्ये मिसळून लावा. नियमित आवळा खाण्याने सुद्धा केस काळे होतात.
3) ब्लॅक टी: ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा. दोन दिवसातून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल.
4) कोरफड: कोरफड जेल मध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.
5) पेरुची पाने: पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा.
6) कडीपत्ता: कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. मोहरीच्या तेलात कडीपत्ता उकळून घ्या. हे तेल नियमित रात्री झोपताना केसांना लावा.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…