इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा.
कसे आहे तेल फायदेशीर
निलगिरीच्या तेलामध्ये अॅन्टीसेप्टीक तसेच अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते. तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते.
मग कसे वापराल निलगिरीचे तेल
मसाज: कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कानात साचलेला मळ मोकळा होण्यासही मदत होते. मात्र त्यासोबत खोबरेल तेल मिसळून मानेकडे खालच्या बाजूला मसाज करा.
वाफ घेणे: सर्दीमुळे किंवा नाक चोंदल्याने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. परिणामी कानदुखीचा त्रासही कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…