आरोग्य

फक्त ४ थेंब तूप ‘या’ पद्धतीने वापरा, आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर होतील

प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी सुचविला आहे. यामध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुपाचा कशा पद्धतीने वापर करावा…

तुपाचे आरोग्यदायी फायदे..

आपल्या शरीराचे असे चार भाग आहेत जिथे जर तुम्ही नियमितपणे तूप लावून मालिश केली तर त्यामुळे अनेक त्रास कमी होऊ शकतात. ते भाग नेमके कोणते याविषयीची माहिती wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

1) डोळे: हात स्वच्छ धुवून शुद्ध तूप थोडेसे बोटावर घ्यावे आणि काजळ लावल्याप्रमाणे बोट फिरवावे. अशा पद्धतीने डोळ्यात थेंबभर तूप घातल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. स्क्रिन पाहून हल्ली अनेकांच्या डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात. हा त्रास कमी करण्यासाठीही थेंबभर तूप उपयोगी ठरते.

2) नाक: एक थेंब तूप बोटाला लावावे आणि ते नाकाला आतून लावावे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी होतो. तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मदत होते.

3) नाभी: थेंबभर तूप बेंबी म्हणजेच नाभीमध्ये घातल्यास प्रजनन संस्था तसेच पचन संस्थेचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच केस आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.

4) तळपाय: थोडेसे तूप घेऊन रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला मालिश करावी. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. मनातले विचार कमी होतात तसेच संपूर्ण शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago