महाराष्ट्र

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री म्हणून १९९१ ते १९९३ या काळात कार्यरत असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवत जलसंधारण, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागावर आधारित विकास मॉडेल राज्यासमोर मांडले. त्यांच्या कार्यकाळात स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली तसेच माती नाला बांध, सलग समतल चर, नाला बंडिंग यांसारख्या लघु जलसंधारण कामांना मोठी चालना मिळाली.

मंत्री संजय राठोड यांनी सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती वाढावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

शासन निर्णयानुसार, या दिवशी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयांमध्ये सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन, मृद व जलसंधारणाची शपथ, जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, जलपूजन, श्रमदान, जनजागृती अभियान तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम विभागाच्या उपलब्ध निधीतून राबविण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे स्व. सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

7 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

7 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago