जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.
समजा एखादी व्यक्तीचं शरीर व्याधी मुक्त आहे, त्याला कोणताही आजार नाही. परंतु तो सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एखादा कायमस्वरूपी रागीट, आदळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही. आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे, तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू.
मानसिक आरोग्य: मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण, तणाव, चिंता, नकारात्मक विचारसरणीला आपल्याला मनात स्थान नसेल.
भावनिक आरोग्य: भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग, लोभ, अहंकार व तिरस्कारला आपल्याला जीवनात स्थान नसेल.
अध्यात्मिक आरोग्य: अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवादने राहणं म्हणजेच अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीरीती वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपराचा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ.
शारीरिक आरोग्य: जेव्हा आपलं शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखले जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…