आरोग्य

आपल्या शरीरातील ‘चार संप्रेरके’ कोणती

१. एंडॉर्फिन्स

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन

आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

एंडॉर्फिन्स

आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.

हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात. हसणे हा एंडाॅर्फिन्स निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे. आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते.

डोपामाईन

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते. जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते. यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?

सेरोटोनिन

जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते. हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.

ऑक्सिटोसिन

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते. मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते. तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.

दररोज व्यायाम करून एंडॉर्फिंन्स मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा. अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल. आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते.

आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…

१) एंडॉर्फिन्स: कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा.

२) डोपामाइन: आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका.

३) सेरोटोनिन: जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा.

४) ऑक्सिटोसिन: जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

4 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago