मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) निर्वी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि १६) रोजी ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर कोपीवर गेल्याने अपघात झाला असुन पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन याबाबत दिपक गणपत वाघ (वय १९) रा. ममदापूर ता. येवला जि. नाशिक याच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि १६) रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली असुन निर्वी येथील कणसेवस्ती जवळ ऊस तोडणारे मजुर दांपत्य दुपारी आपल्या कोपीत आराम करत असताना ट्रॅक्टर नंबर एम एच १२ इ बी ४५५८ च्या चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर कोपीवर गेला. त्यामध्ये फिर्यादीचे वडील गणपत वाघ यांच्या पोटावरुन तसेच आई शोभा वाघ यांच्या तोंडावरुन ट्रॅक्टर गेल्याने ते दोघेही जागीच मयत झाले आहेत.

 

याबाबत अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय..? मग इकडे लक्ष द्याच

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago