आरोग्य

एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होत, वाचाल तर रोज खाल

वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते.

खजूरामध्ये फयबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम भरपूर असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात. त्याशिवाय यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, जर तुम्हाला खजूराकडून जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही ते भिजवून खाल्ले पाहिजे.

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठता दूर होते, हृदयासाठी चांगले, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत, हाडे मजबूत होतात, ब्लड प्रेशर कंट्रोल, पुरूष आणि महिलांची लैंगिक क्षमता वाढवतात, मेंदुसाठी फायदेशीर, कमजोरी दूर होते, रक्ताची कमतरता दूर होते, सूज कमी करतात, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे

1) वजन होईल कमी

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.

2) वाढेल एनर्जी

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढते. तसेच तुमच्या भरपूर एनर्जी राहते.

3) डायजेशन होईल मजबूत

ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

एका दिवसात किती खजूर खावेत

डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्या वयातील लोकांनी दिवसातून 2 खजूर खाण्यास सुरूवात करावी. वजन वाढवणाऱ्यांनी रोज 4 खजूर खावेत.

खजूर भिजवून का खावेत

भिजवल्याने खजूरातील टॅनिन आणि फायटिक अॅसिड निघून जातं. ज्यामुळे पोषक तत्व सहजपणे अवशोषित करण्यास मदत मिळते. भिजवलेले खजूर लवकर पचतात. जर तुम्हाला खजूराचे जास्त फायदे हवे असतील तर ते रात्री 8 ते 10 तास भिजवून ठेवा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

14 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

14 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

14 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

14 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago