आरोग्य

किडनी स्टोन म्हणजे काय?

मूतखडा (किडनी स्टोन): दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.

कोठा साफ होण्यासाठी:- सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.

दातांच्या बळकटीसाठी:- पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.

हिरड्या फुगल्यास:- मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.

गालगुंड:- उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

चेहरा धुण्यासाठी:- ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.

मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी:-  लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.

संधिवात व हाडांचे दुखणे:- पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.

स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार:- काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.

टकलावर केस येण्यासाठी:- सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते. कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.

झोपेत घोरण्याची समस्या:- तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

माथा उठणे:- गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.

त्वचेला खाज येत असल्यास:- दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.

मधुमेह (शुगर):- सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा. जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही. दुपारी बाहेरुन आल्यानंतर गुळाचा एक खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे साखर वाढत नाही.

लूज मोशन:- चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.

लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास:- वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून व गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे. आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत नाही. स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते. स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही. स्त्रियांनी एक मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या बोटाने) कुंकू लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा. पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहाते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

20 तास ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

20 तास ago

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

3 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

3 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

3 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

4 दिवस ago