दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. हे नॅच्युरल ड्रिंक तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. यातील कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते याशिवाय आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. पण प्रत्येकालचा दूध प्यायला आवडतच असं नाही. अशा स्थितीत शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की हे न्युट्रिएंट्स मिळवण्यासाठी दूधच प्यायला हवं असं काही नाही. काही इतर पदार्थ खाऊनही तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता.
१) संत्री: संत्री एक कॉमन फूड आहे ज्यामुळे व्हिटामीन सी मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे इम्युनिटी वाढते. संत्र्याचा रस प्यायल्यानं शरीरात कॅल्शियमची कमतरता उद्भवणार नाही.
२) ओट्स: ओट्स एक हेल्दी डाएट आहे. सकाळच्या नाशत्याला तुम्ही ओट्स खाऊ शकता. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे शरीर मजबूत राहते. अशावेळी मिल्क इन्टेक घ्यायलाच हवा असं काही नाही.
३) ऊन: तुम्ही ऐकलं असेल की व्हिटामीन डी मिळवण्यासाठी ऊन्हात जायला हवं. सुर्य प्रकाशाच्या माध्यमातून तुम्हाला कॅल्शियम मिळू शकते.
४) हिरव्या भाज्या: हिरव्या भाज्या खाणं नेहमीच फायदेशीर ठरतं. यातून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व मिळतात. आपल्या रोजच्या आहारात पालक, शेपू, मेथी या भाज्यांचा समावेश करा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…