आरोग्य

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत.

मोबाईल फोनमधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात. मोबाईल मधून निघणारे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत. मोबाईल फोनमधून जो निळा प्रकाश निघतो. त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.

काय होतात समस्या

मोबाईल फोनमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गयनायझेशन नुसार, फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदुवर गंभीर प्रभाव पडतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी, चिडचिडपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात. मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात. त्यामुळे प्रयत्न करा की, झोपताना फोन दूर ठेवावा. जर तुम्हाला फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंट करून दूर ठेवा. त्याऐवजी आवडीचं एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा.

काही ठिकाणी मोबाईल टाळा

घरात काही ठिकाणं जसे की, जेवणाचा टेबल, झोपण्याची खोली, बाथरूम मोबाईल मुक्त ठेवा. असं केलं तर घरातील लहान मुले देखील या ठिकाणांवर फोन वापरणार नाही.

डिजिटल डिटॉक्स

आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा. याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि तुम्हाला त्यांच्या सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. याने तुमचे संबंध मजबूत होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago