आरोग्य

वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय

जेव्हा खोकला, सौम्य ताप व थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात किंवा दिसू लागतात तेव्हा हे सांगणे कठीण होऊ शकते की, तुम्हाला सामान्य सर्दी आहे की दुसरा कोणता गंभीर आजार. जसे की, वॉकिंग न्यूमोनिया; हा एक सौम्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. या संसर्गामुळे जाणवणाऱ्या सूक्ष्म लक्षणांकडे अनेकदा सर्दी समजून दुर्लक्ष केले जाते. या आजाराला इंटेन्सिव्ह उपचारांची आवश्यकता नसली तरीही सामान्य व वॉकिंग न्यूमोनियामधील फरक समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेण्यास मदत करू शकते.

वॉकिंग न्यूमोनिया म्हणजे काय 

वॉकिंग न्यूमोनिया हा न्यूमोनियाचाच एक प्रकार आहे; जो फुप्फुसातील स्थानिक संसर्गाद्वारे दर्शविला जातो. सामान्य न्यूमोनियाव्यतिरिक्त वॉकिंग न्यूमोनियाग्रस्त रुग्णांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अस्वस्थता असूनही तुम्ही दैनंदिन हालचाली सुरू ठेवू शकतात. वॉकिंग न्यूमोनियाच्या लक्षणांमध्ये कमी दर्जाचा ताप, सततचा खोकला, थुंकीचा त्रास व अधूनमधून श्वसन समस्या यांचा समावेश होतो. परंतु, रक्तदाब, नाडीची गती (पल्स रेट) व ऑक्सिजनची पातळी सामान्यतः स्थिर राहते; ज्यामुळे हा रोग सामान्य न्यूमोनियापेक्षा वेगळा ठरतो. तुम्ही जर या आजारादरम्यान एक्स-रे काढलात, तर तुमच्या छातीच्या एक्स-रेवर पांढरा बिंदू दिसतो. हाच बिंदू अनेकदा वॉकिंग न्यूमोनिया आहे हे दाखवून देतो आणि फुप्फुसाचा दाह अधोरेखित करतो.

वॉकिंग न्यूमोनियाची कारणे

अशा प्रकारचा न्यूमोनिया प्रामुख्याने मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, क्लॅमिडिया न्यूमोनिया व लेजिओनेला न्यूमोफिला यांसारख्या ॲटोपिकल बॅक्टेरियामुळे होतो. तरुण लोकांवर याचा अधिक दुष्परिणाम होतो आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीवर याचा दुष्परिमाण होऊ शकतो.

वॉकिंग न्यूमोनिया होण्याच्या कारणांमध्ये खराब पोषण, झोप न लागणे, हवेतील प्रदूषकांचा संपर्क व विषाणूजन्य संसर्ग यांचा समावेश होतो. सामान्यतः चांगली रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींनाही वॉकिंग न्यूमोनिया प्रभावित करतो; परंतु बहुतांशी त्यांच्यात दिसणारी लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात.

वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक

वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्यत: सर्दी या दोहोंमध्ये खोकला, सौम्य ताप, थकवा यांसारखी लक्षणे जाणवत असली तरीही त्यांच्यातदेखील महत्त्वाचा फरक आहे. वॉकिंग न्यूमोनिया हा फुप्फुसांवर परिणाम करणारा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे आणि सामान्य सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे; जो विशेषत: फक्त श्वसनमार्ग (नाक आणि घसा) प्रभावित करतो.

एक्स-रे न्यूमोनियाची उपस्थिती दर्शवू शकतो. तर सामान्य सर्दी क्वचितच इमेजिंगवर दिसणारी चिन्हे दर्शवते. पण, मुख्य फरक हा उपचारांमध्ये असतो. वॉकिंग न्यूमोनियामध्ये ॲटोपिकल बॅक्टेरियांना लक्ष्य करणारे अँटिबायोटिक उपचार आवश्यक असतात. तर सामान्य स्वरूपाची सर्दी आपोआप बरी होते आणि त्याला अँटिबायोटिक्सची गरज नसते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago