मुख्य बातम्या

शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

भारतीय संस्कृती जोपासणारे व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवणारी शिक्षण संस्था म्हणजेच शिरूरची सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षण पूर्णता (MCF) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाची कला, शारीरिक व्यायाम, योग, शिस्त, नेतृत्व कौशल्य, संघटनात्मक क्षमता आणि संकट व्यवस्थापन शिकवण्यासाठी आयोजित या विशेष प्रशिक्षण सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या ध्वजवंदनाने संस्थेचे अध्यक्ष अनिल पायस व संस्थेच्या सचिव नॅन्सी पायस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक परेड मार्च पास सादर केला. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी बँडचे उत्कृष्ट कौशल्य दाखवले. परेडनंतर झिप लाईनवरून निर्भीड कसरती सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर योगा आणि दैनंदिन व्यायाम प्रकारांचे सादरीकरण प्रभावीपणे झाले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि मल्लखांब या पारंपरिक कला सादर करून प्रेक्षकांना इतिहासाच्या आठवणींनी भारावून टाकले. विशेषतः इयत्ता दुसरीतील एका विद्यार्थ्याने सादर केलेले अश्वरोहण सर्वांचे मन जिंकून गेले. त्यानंतर नेमबाजीचे कौशल्य विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले.

सर्वात आकर्षक भाग म्हणजे वाघा बॉर्डरच्या (अटारी बॉर्डर) रिट्रीटचे प्रदर्शन विशेष आकर्षक ठरले, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवरील सैनिकांच्या रिट्रीटचे उत्कृष्ट अनुकरण केले गेले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आगीच्या गोळ्यांमधून उड्या मारत निर्भीडपणा आणि साहसाचे उत्तम उदाहरण सादर केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सुभेदार देवराम मिंडे, मेजर दत्तात्रेय विठ्ठल येणारे, ज्येष्ठ पत्रकार नितीनभाऊ बारवकर, आदर्श माजी सरपंच अरुणराव घावटे, माजी सरपंच विठ्ठलराव घावटे, सुनील भाकरे सर, अविनाश घोगरे, पीटर गुडीनो, लतिशा पायस, क्लेरिसा मास्करीनस, अनिता पायस आणि अॅलन पायस आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुभेदार देवराम मिंडे यांनी बोलताना सांगितले, “शिरूरच्या रामलिंगसारख्या पवित्र ठिकाणी ग्रामीण भागात असणारी सकारात्मक वास्तु आणि असे विशेष शिक्षण देणारी सेंट जोसेफ ही एकमेव शाळा आहे. अशा शाळा ग्रामीण भागामध्ये होणे ही काळाची गरज आहे. काळाची गरज ओळखून ही शाळा एवढे चांगले प्रशिक्षण देत आहे, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.

सेंट जोसेफ सारख्या शाळेतून भविष्यात विद्यार्थी एनडीए, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये दाखल व्हावेत, हीच आपली मनापासून इच्छा आहे.”या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षण व शारीरिक सक्षमता किती महत्त्वाची आहे, हे प्रभावीपणे सादर केले. मार्शल आर्ट आणि कॅरेट फोर्सचे प्रशिक्षण आजच्या काळात किती गरजेचे आहे, यावरही यावेळी भर देण्यात आला. नुकतेच पार पडलेले शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन त्याचबरोबर शाळेत संपूर्ण वर्षभरात घेतले जाणाऱ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबरच सर्वधर्मसमभाव ही भावना जोपासण्यास मदत होते.पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago