आरोग्य

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

1) सकाळचा नाश्ता (सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत) हलका आणि पौष्टिक आहार घ्या.

सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे.

2) दुपारचे जेवण (दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) थोडा जड आहार घ्यावा.

दुपारच्यावेळी पचनशक्ती सर्वात जास्त चांगली असते, ज्यामुळे शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात. यासाठीच तुमच्या दुपारच्या जेवणात डाळ, भात, रोटी, भाज्या आणि देशी तूप असा संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थ टाळा.

3) संध्याकाळचा नाश्ता (सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत) – हलका नाश्ता.

संध्याकाळी हलका नाश्ता खाल्ल्याने रात्रीच्या जेवणापूर्वी जास्त भूक लागत नाही आणि पचन सुधारते. यावेळी फळे, भाजलेले मखाणे, सुकामेवा किंवा हर्बल टी घेणे फायदेशीर ठरते. शक्यतो पॅकेजिंग केलेले स्नॅक्स, खूप गोड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

4) रात्रीचे जेवण (सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत) हलके अन्नपदार्थ खा.

रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते, त्यामुळे रात्री उशिरा जड जेवण केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या जेवणात डाळ, हलक्या भाज्या, खिचडी किंवा सूप असे अन्नपदार्थ खावेत. जास्त मसालेदार, पचायला जड आणि फ्रिजमधील थंड अन्नपदार्थ खाऊ नयेत.

5) झोपण्यापूर्वी (रात्री ९ ते १० वाजेपर्यंत) तुम्ही काहीतरी हलके पिऊ शकता.

झोपण्यापूर्वी जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर कोमट हळदीचे दूध, हर्बल टी किंवा कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

5 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

5 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

9 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

12 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

12 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

12 तास ago