आरोग्य

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण जाणून घेऊ या.

मूत्रपिंड: कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड रक्ताचे शुद्धीकरण करते आणि ते मूत्र म्हणून उत्सर्जित करते. मूत्रपिंडाच्या चांगल्या कार्यासाठी पुरेसे हायड्रेशन महत्त्वाचे आहे.

आतडे आणि मायक्रोबायोम: पाचक मुलूख मलमार्गे कचरा काढून टाकतो आणि आतड्यातील जीवाणू हानिकारक पदार्थांना निष्प्रभ करण्यात भूमिका बजावतात. आतड्याची हालचाल आणि सूक्ष्म जीव संतुलनासाठी फायबर आवश्यक आहे.

लिम्फॅटिक सिस्टीम: ही प्रणाली सेल्युलर कचरा गोळा करते आणि काढून टाकण्यासाठी रक्तप्रवाहात वितरित करते. त्याचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक क्रियाकलाप महत्त्वाचा आहे.

फुप्फुसे आणि त्वचा: फुप्फुसे कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. एका वेळच्या चयापचय प्रक्रियेतून त्वचा शरीरातील टाकाऊ वा विषाक्त पदार्थ घामाद्वारे बाहेर टाकते.

यकृत: रात्रभर यकृत सक्रियपणे विषाक्त पदार्थांचे चयापचय करते आणि त्यामुळे हा प्रक्रिया केलेला कचरा हायड्रेशन आणि फायबरद्वारे बाहेर काढण्यासाठी सकाळ महत्त्वाची ठरते. सकाळी कॉर्टिसॉल व एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी शिखरावर असते; जी पचन आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी आवश्यक त्या ऊर्जेचे उत्पादन वाढवते, असे जोशी नमूद करतात. शरीराला पुनर्संचयित करण्यासाठी आणि नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वाढविण्यासाठी सकाळ ही एक महत्त्वाची वेळ आहे.

शरीरासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या पाच सवयी

हायड्रेशनने सुरुवात करा 

झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी प्रदान करते. एक अँटिऑक्सिडंट जे यकृताच्या कार्यास समर्थन देते आणि पचन सुधारते. हायड्रेशन रात्रभर साचलेल्या विषाक्त पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते आणि काही तासांच्या उपवासानंतर शरीराला पुन्हा हायड्रेट करते.

ध्यानाचा सराव करा

ताण कमी करणे आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारणे यांसाठी ५-१० मिनिटे ध्यानधारणा करा. त्यामुळे योग्य ऑक्सिजनेशन सेल्युलर फंक्शन आणि कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकण्यास समर्थन मिळते.

स्ट्रेच किंवा व्यायाम

स्ट्रेचिंग, योगासन किंवा वर्कआउट शरीराच्या डिटॉक्स नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिम्फॅटिक सिस्टीमला सक्रिय करते. शारीरिक हालचाल रक्तप्रवाह वाढवते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

फायबरयुक्त नाश्ता घ्या

तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स, चिया सीड्स, ताजी फळे किंवा भाज्या यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. फायबर पचनसंस्थेतील विषारी द्रव्यांना एकत्र बांधून ठेवते आणि ते विष्ठेद्वारे काढून टाकण्यास मदत करते. फायबरसमृद्ध पदार्थांमधील प्री-बायोटिक्स आतड्यांतील जीवाणूंचे पोषण करतात आणि एकूणच डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

16 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

17 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

23 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

23 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

23 तास ago