आरोग्य

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत.

शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया कशी कार्य करते?

आश्लेषा जोशी, Tone30 पिलेट्स मधील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ, सांगतात, “शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रणाली हे यकृत, मूत्रपिंड, लिम्फॅटिक प्रणाली, फुप्फुस, त्वचा व आतडे यांचा समावेश असलेले एक जटिल जाळे आहे. हे अवयव विष, टाकाऊ पदार्थ आणि चयापचय उपउत्पादने काढून टाकण्यासाठी एकत्र काम करतात.

यकृत: यकृत हा डिटॉक्सिफिकेशनचे कार्य करणारा मध्यवर्ती अवयव आहे. हा अवयव रक्त शुद्ध करतो, पाण्यात विरघळणाऱ्या विषाक्त पदार्थांमध्ये चयापचय प्रक्रिया करतो.

मूत्रपिंड: कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड रक्ताचे शुद्धीकरण करते आणि ते मूत्र म्हणून उत्सर्जित करते. मूत्रपिंडाच्या चांगल्या कार्यासाठी पुरेसे हायड्रेशन महत्त्वाचे आहे.

आतडे आणि मायक्रोबायोम: पाचक मुलूख मलमार्गे कचरा काढून टाकतो आणि आतड्यातील जीवाणू हानिकारक पदार्थांना निष्प्रभ करण्यात भूमिका बजावतात. आतड्याची हालचाल आणि सूक्ष्म जीव संतुलनासाठी फायबर आवश्यक आहे.

लिम्फॅटिक सिस्टीम: ही प्रणाली सेल्युलर कचरा गोळा करते आणि काढून टाकण्यासाठी रक्तप्रवाहात वितरित करते. त्याचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक क्रियाकलाप महत्त्वाचा आहे.

फुप्फुसे आणि त्वचा: फुप्फुसे कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. एका वेळच्या चयापचय प्रक्रियेतून त्वचा शरीरातील टाकाऊ वा विषाक्त पदार्थ घामाद्वारे बाहेर टाकते.

“रात्रभर यकृत सक्रियपणे विषाक्त पदार्थांचे चयापचय करते आणि त्यामुळे हा प्रक्रिया केलेला कचरा हायड्रेशन आणि फायबरद्वारे बाहेर काढण्यासाठी सकाळ महत्त्वाची ठरते. सकाळी कॉर्टिसॉल व एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी शिखरावर असते; जी पचन आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी आवश्यक त्या ऊर्जेचे उत्पादन वाढवते. आपले शरीर पूर्ववत करणे आणि त्याच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेस समर्थन देणे यांसाठी सकाळी ९ च्या आधी केल्या पाहिजेत. शरीराला पुनर्संचयित करण्यासाठी आणि नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वाढविण्यासाठी सकाळ ही एक महत्त्वाची वेळ आहे. शरीरासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या पाच सवयी

हायड्रेशनने सुरुवात करा. झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी प्रदान करते. एक अँटिऑक्सिडंट जे यकृताच्या कार्यास समर्थन देते आणि पचन सुधारते. हायड्रेशन रात्रभर साचलेल्या विषाक्त पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते आणि काही तासांच्या उपवासानंतर शरीराला पुन्हा हायड्रेट करते.

ध्यानाचा सराव करा

ताण कमी करणे आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारणे यांसाठी ५-१० मिनिटे ध्यानधारणा करा. त्यामुळे योग्य ऑक्सिजनेशन सेल्युलर फंक्शन आणि कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकण्यास समर्थन मिळते.

स्ट्रेच किंवा व्यायाम

स्ट्रेचिंग, योगासन किंवा वर्कआउट शरीराच्या डिटॉक्स नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिम्फॅटिक सिस्टीमला सक्रिय करते. शारीरिक हालचाल रक्तप्रवाह वाढवते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

14 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

18 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

18 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

19 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

19 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

19 तास ago