आरोग्य

कोण म्हणत वजन कमीच होत नाही, करा हे साधे-सोपे उपाय

वजन दिवसेंदिवस वाढत जातंय. कमी होतच नाही.” “डाएट, जिम सगळं केलं तरीही वजन कमी होत नाही…” असे अनेक संवाद आजकाल आपल्या कानांवर सर्रास पडतात. मुळातच आपल्या सगळ्यांना आपलं वजन मापात असावं, आपण परफेक्ट दिसावं, वयोमानाप्रमाणे फिट राहावं अशी इच्छा असते. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नसतो, योग्य आहार घेण्याचं काहीच वेळापत्रक नसत. अशा परिस्थितीत कितीही प्रयत्न केले तरीही वजन कमी होणारच नाही. मुळातच वजन कमी करणे हे अनेकांना खूप मोठं कष्टाचं काम वाटत.

वजन कमी करण्याचे सोपे नियम कोणते

जेवणाचे प्रमाण योग्य ठेवणे

वजन कमी करणे हे काही रॉकेट सायन्स नाही. तर ही एक सवय आहे. दिनक्रमातील चांगल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट अंगवळणी पाडून घ्या. दररोज योग्य प्रमाणात जेवणे हा एक नित्य नियमाचा भाग करून घ्या. योग्य प्रमाणात घरचं जेवणे हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला नक्कीच मदत करेल. जेवताना पोटाचे अदृश्य चार भाग करा. एका भागात अन्न, एका भागात पाणी आणि उरलेल्या दोन भागात हवा. आहाराला इतकंच महत्व द्या पोटभरून जेऊ नका.

जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळणे 

अनेकदा कामाच्या गडबडीत आपण कधीही जेवतो. बराच काळ उपाशी राहतो. यामुळे जेव्हा भूक लागते तेव्हा जंक फूड किंवा हातात जे मिळेल ते खातो. असं न करता योग्य वेळेत जेवण्याची सवय लावून घ्या. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा. शक्य असल्यास रात्री ७ नंतर काही खाऊ नका. कारण वेळेत जेवणे हे वजन कमी करण्याचे एक गुपित आहे.

जेवण्याची योग्य पद्धत पाळा 

जेवण योग्य प्रमाणात तसं योग्य पद्धतीत असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जंक फूड पूर्ण टाळून फक्त घरचं जेवण घ्या. अति तेल आणि मांसाहार टाळा. जेवण तयार करताना प्रोटीन, फायबर या सगळ्याचा विचार करा. त्यामुळे बाहेरचं जेवण टाळून घरचा आहार घ्या.

स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करा 

स्वतःच शरीर हे जगातील सुंदर गोष्ट आहे. त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहा. वजन कमी करायला लागणे यापेक्षा आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे, असा विचार केल्यास तुमचा दृष्टीकोन बदलेल आणि वजन कमी करणे हा खडतर प्रवास वाटणार नाही. या वरील चार गोष्टी केल्यामुळे तुमच्या शरीराचा हेल्थ पॅरामिटर आपोआप सुधारणार आहे. यामुळे तुमचं वजन सहज कमी होणार आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

14 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

14 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

14 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago