आरोग्य

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता.

तणाव आणि थकव्यापासून आराम

गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने शरीराच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो, त्यामुळे दिवसभराचा ताण आणि थकवा कमी होतो. यामुळे मनाला शांती मिळते आणि तुम्हाला आरामही वाटतो.

ब्लड सर्क्युलेशन होतं नीट

गरम पाण्यात पाय ठेवल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन आणखी चांगलं होतं. यामुळे हात आणि पायांचा थकवा दूर होतो आणि शरीरात उष्णता टिकून राहते.

सुजलेल्या पायांपासून आराम

दिवसभर काम केल्याने किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने पायांना सूज येऊ शकते. गरम पाण्यात पाय ठेवल्याने सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही पाण्यात थोडेसं मीठही टाकू शकता.

झोपेची गुणवत्ता सुधारते

जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटं गरम पाण्यात पाय टाकून बसा. ही प्रक्रिया शरीराला शांत करते आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.

स्कीन इन्फेक्शनपासून सुटका

गरम पाण्यात पाय भिजवल्याने त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे घाण आणि डेड स्कीन सहज निघून जाते. यामुळे पायांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनते.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

गरम पाण्यात पाय टाकल्याने शरीराला ऊब मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. कोणत्याही औषधाशिवाय सर्दीपासून बचाव करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

16 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

16 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

16 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago