आरोग्य

१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते

शुगर म्हणजेच साखरेचा वापर रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आरोग्याची काळजी घेणारे लोक साखर कमी खातात तर जास्तीत जास्त लोक जास्त खातात. मग ती चहाच्या माध्यमातून असो वा गोड पदार्थांच्या माध्यमातून असो.

आपण नेहमीच ऐकतो की, साखर जास्त खाल्ल्यानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तरीही लोकांना साखर खाण्याची सवय झालेली असते. इथे साखरेचा अर्थ केवळ साखर नाही तर वेगवेगळे गोड पदार्थ असा आहे.

जेवढी जास्त साखर खाल तेवढा टाइप २ डायबिटीस, लठ्ठपणा, हृदरोग, त्वचे विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे साखर कमी खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही काही दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर आरोग्याला इतके फायदे मिळतील ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अशात २ आठवडे म्हणजे १४ दिवस साखर खाणं बंद केलं तर काय होईल.

१४ दिवस साखर न खाण्याचे फायदे…

पोटावरील चरबी होईल कमी…

डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही जर केवळ १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं तर तुमच्या पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल. इतकंच नाही तर लिव्हरवर जमा झालेली चरबी देखील साखर खाणं बंद केल्यावर कमी होईल.

पोट चांगलं राहील…

तुम्ही जर १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केल तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. साखर खाणं सोडल्यानं हेल्दी बॅक्टेरिया रीस्टोर होतात, ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.

अॅक्ने होतील दूर…

जर साखरेला रोजच्या आहारातून बाहेर काढलं तर चेहऱ्यावरील अॅक्ने किंवा रेड स्पॉट कमी होतात. त्यामुळे चेहरा आणखी फ्रेश आणि चमकदार दिसतो.

चेहऱ्याचा शेपही होईल नॅचरल…

जर तुमच्या चेहऱ्यावर सर्कल दिसत असतील किंवा चेहऱ्यावर सूज आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही साखर खाणं लगेच बंद केलं पाहिजे. साखर खाणं बंद कराल तर चेहऱ्याचा शेप नॅचरल होईल.

एका दिवसात किती साखर खावी…

वयस्कांनी एका दिवसात ३० ग्रॅमपेक्षा अधिक फ्री शुगर खाऊ नये. त्याशिवाय ७ ते १० वर्षाच्या मुलांनी रोज २४ ग्रॅम आणि ४ ते ६ वर्षाच्या मुलांनी १९ ग्रॅमपेक्षा अधिक साखर खाऊ नये. एक चमचा साखरेमध्ये जवळपास २० कॅलरी असतात. जर तुम्ही जास्त साखर किंवा गोड खात असाल तर जास्त कॅलरी इनटेक करता. अशात तुमचं वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

16 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

20 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago