महाराष्ट्र

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान ऑनलाइन जमा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता आज, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन जमा करण्यात आला आहे. यासाठी ७९ कोटी २१ लाख ९४ हजार रुपयांची देयके पारित करण्यात आली असून, राज्यातील १० हजार ३१२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून प्रतिवर्षी दोन समान हप्त्यांमध्ये सहाय्यक परिरक्षण अनुदान दिले जाते. यापूर्वी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत पारंपरिक पद्धतीने अनुदानाचे वितरण केले जात होते. त्यामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयांना एकाच वेळी अनुदान मिळण्यात अडचणी येत होत्या. तसेच अनुदान वितरणास विलंबही होत होता.

ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या माध्यमातून सन २०२२-२३ पासून संगणकाधारित ‘ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली’ (Library Grant Management System) विकसित करण्यात आली. या प्रणालीमुळे अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाली आहे.

सन २०२६-२७ या वर्षातील अनुदानाच्या पहिल्या हप्त्यासाठी दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन ज्ञापनान्वये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ग्रंथालय संचालनालयास ऑनलाइन वार्षिक अहवाल प्राप्त झालेल्या राज्यातील १० हजार ३१२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानाची देयके संगणकाधारित प्रणालीद्वारे पारित करण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार VPDA प्रणालीच्या माध्यमातून दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी हे अनुदान थेट संबंधित ग्रंथालयांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

संगणकाधारित प्रणालीमुळे अनुदान वितरणात सुलभता

ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीमुळे अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे. थेट बँक खात्यांमध्ये अनुदान जमा होत असल्याने वितरणातील विलंब कमी होऊन राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि विकासात्मक उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

2 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

3 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

4 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

5 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

6 तास ago

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

18 तास ago