आरोग्य

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे?

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे?

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात. दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे दुधाचे नियमित सेवन करावे. याशिवाय दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे स्नायूंसाठी फायदेशीर मानले जातात.

दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

दूध हे दातांकरता देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.

दुधाच्या सेवनाने वजन कमी होते.

वाढते वजन कमी करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.

मधुमेहासाठी फायदेशीर

दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. दुधात असलेल्या फॅटी अॕसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.

पोटासंबंधित आजार बरे होतात 

दुधामुळे अपचन आणि अॕसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधात अँटासिडचा समावेश असतो. ज्यामुळे अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी थंड दूध वापरावे. थंड दूध पोटातील आम्ल कमी करते.

झोपेसाठी उत्तम

अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोप चांगली लागते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन ही अमीनो अॕसिड असतात. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री झोप न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध रोज प्यावे. घरगुती उपायामुळे वरील त्रासांपासून आराम मिळेल परंतु कोणत्याही आजारातून जर पूर्णपणे बरे व्हायचे असेल तर तो शास्त्रशुद्ध चिकित्सा पद्धतीनेच बरा होऊ शकतो आमच्याकडे त्यासाठी काही विशिष्ट व गुणकारी औषधी आहे. त्यासाठी आजच संपर्क साधा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवसेना पक्षफुटी प्रकरणात सिब्बलांचा दोन सवालांनी शिंदे गटाची कोंडी?

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…

1 तास ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…

1 तास ago

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…

2 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…

2 तास ago

मुंबई–गोवा महामार्गासाठी ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प; चाकरमान्यांना ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या…

3 तास ago

झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…

6 तास ago