हातापायाला आलेल्या मुंग्या घालवण्याचे घरगुती उपाय…
१) मसाज मुंग्या येणाऱ्या भागाला नियमितपमे साध्या खोबरेल तेलाने मसाज केला तरी मुंग्या यायचं प्रमाण खूप कमी होतं. मसाज केल्याने तिथल्या नसा मोकळ्या होतात आणि त्या भागाचा रक्तपुरवठा सुधारतो. रक्त पुरवठा व्यवस्थित झाला की मग मुंग्यांचा त्रास होत नाही.
२) गरम शेक गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने शेकल्यावर सुद्धा रक्त पुरवठा सुधारतो. मुंग्या येणाऱ्या भागातल्या नर्व्हज सुद्धा शेकण्यामुळे मोकळ्या होतात आणि मुंग्यांचा त्रास कमी होतो. गरम पिशवी घेऊन मुंग्या येत असतील त्या भागावर ठेऊन पाच ते सात मिनिटं, असं दिवसातून दोन – तीनदा शेकलं तर मुंग्यांचा त्रास नक्कीच कमी होईल.
३) एप्सम सॉल्ट एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे नर्व्हज मधलं इंफ्लेमेशन कमी होते आणि असं झालं की मुंग्या येण्याचं कारणाच राहत नाही.
४) दालचिनी दालचिनीमध्ये मँगनीज आणि पोटॅशिअम खूप प्रमाणात असतं. या दोन्हीचा रक्त पुरवठा सुधरवायला उपयोग होतो म्हणूनच दालचिनी हा मुंग्यांवर फार प्रभावी उपाय आहे कारण मुंग्या येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रक्तपुरवठा कमी होणं . एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास गरम पाण्यात घालून रोज एकदा घेतलं तर या उपायाचा लगेच फायदा होईल.
५) दही हा सगळ्यात सोपा उपाय आहे , यात काय करायचं आहे तर रोज फक्त थोडं दही खायचं आहे . दह्यात मँगनीजचं प्रमाण खूप जास्त असल्याने त्याचा रक्त पुरवठा सुधरवण्यासाठी फायदा होतो.
मुंग्या येऊच नयेत म्हणून काय काळजी घ्यायची…?
१) एका जागी फार वेळ बसून राहू नये. कामाचं स्वरूपच बसण्याचं असेल तर दर तासाभराने उठून थोडी हालचाल करावी. बसल्या बसल्या सुद्धा हात – पाय – मान यांचे किरकोळ व्यायाम करावेत.
२) जेवणात व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाण वाढवा. अंडी, नॉनव्हेज, दूध यामध्ये व्हिटॅमिन बी १२ जास्त प्रमाणात आढळतं. जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य घ्यावीत.
३) सिगारेट, तंबाखू, दारू या व्यसनांचा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे त्यापासून लांब राहणंच आपल्या हिताचं आहे.
४) मधुमेह असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टरांच्या औषधाबरोबरच आहारात बदल आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. मधुमेह नियंत्रणाबाहेर गेला तर मुंग्यांचा त्रास वाढू शकतो म्हणून ही काळजी घ्यावी.
५) पोहणे, योगासनं यामुळे रक्तपुरवठा सुधारतो त्यामुळे हे व्यायाम आवर्जून करावेत.
६) आहारात व्हिटॅमिन ‘ बी ‘ वाढवावे. मोड आलेली कडधान्य, गहू, ओट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
७) जेवणात कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन वाढवावीत. हातापायाच्या मुंग्या घालवण्यासाठी हे उपाय
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…