ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीच्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर पुष्प अर्पण करत पवित्र स्मृतींना आदरांजली वाहिली.
यापूर्वी मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथेही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुले अर्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह ठाणे आणि राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…