आरोग्य

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात. जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो.

उगवत्या सूर्याकडे बघा: उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बदलू शकतो. झाडांच्या पानांवर पडलेले सूर्य किरणे जे इंद्रधनुष्य निर्माण करतात. विविध रंगांच्या फुलांवरील सूर्य किरणे पहावी. सकाळी होणारा पक्षांचा किलबिलाट ऐकावा. यावेळी नैसर्गिक उजेडात एक स्मित हास्य देऊन सेल्फी काढा. या नैसर्गिक वातावरणात तुमच्या मध्ये उच्च ऊर्जा निर्माण होईल.

चालायला जा, धावा: धावायला जा. यावेळी तुमच्या सोबत पाण्याची बाटली, मास्क, ठेवा. पार्क मध्ये नैसर्गिक वातावरणात धावा. जेथे पक्षांचा किलबिलाट असेल. हिरवेगार वातावरण तुमच्या मध्ये हार्मोन बदल करतात.

लहान मुलांबरोबर खेळा: लहान मुलांचं हास्य निखळ असते. त्यांना मिठी मारणं, त्यांच्या सोबत खेळणं, यामुळे तुमच्या मध्ये ऑक्सीटॉसिन नावाचे संप्रेरक निर्माण होते, जे तुमच्या मनावरील ताणाव दूर करते. तुमच्या भावना यामुळे चांगल्या व्यक्त होऊ लागतात.

तुमच्या आवडीचे काम करा: वेगवेगळ्या आवडी असतात; जसे पोहणे, वाचणे, खेळणे, चित्र काढणे, फोटोग्राफी; यात तुम्ही निवांत वेळ घालवा. थकवा दूर होण्यास मदत होईल. यामुळे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते.

योगासन करा: योगामुळे तणाव दूर होतो. जीवनात काय हवे आणि काय नको यावर लक्ष केंद्रित होईल. यामुळे तणाव दूर होतो आणि सकारात्मकता निर्माण होईल.

अन्नातून सेरोटोनिन मिळवा: सेरोटोनिन संप्रेरकांमुळे मूड चांगला होऊन आनंदी राहाल. यामध्ये बिया वर्गीय धान्य, प्रोटीन, मांसाहार तसेच इतर आहारातून सेरोटोनिन मिळवू शकता.

तेलाचा मसाज: तेलाचा मसाज करण्याने शरीराला शांती मिळण्यास मदत होते. यामुळे हार्मोन निर्माण होऊन मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. यासाठी लोह देणारे लिंबू वर्गीय फळ खाऊ शकता.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो. नैसर्गिक आणि साधी जीवन पध्दती एक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळवायचं असेल, तर इतर पर्याया पेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि मनस्थितीला पुन्हा परत आणणे फायदेशीर ठरू शकते. नेहमी लक्षात ठेवा की, केवळ तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता, इतर कोणीही नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago