महाराष्ट्र

‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, श्री.वि. कुलकर्णी यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना असामान्य साहित्यिक अभिव्यक्ती देत मराठी ललित साहित्य समृद्ध केले. डोह, मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

‘मौज’ या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नवे आयाम दिले. साहित्यावरील त्यांची निष्ठा, संवेदनशीलता आणि साधेपणा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.

श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; "एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा" मुंबई…

3 मिनिटे ago

दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा,…

8 मिनिटे ago

शेणातून होणार लाखोंची कमाई! सरकार खरेदी करणार बायोगॅस; ‘गोवर्धन’ योजनेला 23,731 कोटींची मंजुरी

नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची…

14 मिनिटे ago

शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

18 मिनिटे ago

गैरसमज दूर होईल; मनोज जरांगेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा…

21 मिनिटे ago

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर 'डबल ढोलकी' वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही…

26 मिनिटे ago