महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर ‘डबल ढोलकी’ वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप

अंतरवाली सराटी: मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, अवैध ठरवलेली जात प्रमाणपत्रे तातडीने वैध करण्यात यावीत, अन्यथा सरकार पाडण्याचा इशारा दिला.

जात प्रमाणपत्र रद्द झालेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती शिंदे, गंगापूरच्या नगरसेविका वर्षा गायकवाड-बोडखे, परभणी जिल्हा परिषद सदस्या कोमल पारवे आणि माजलगावच्या नगरसेविका रेखा अंभोरे-सरोदे यांचा समावेश आहे. यापैकी तिघांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. संभाजीनगरमधील काही लोकप्रतिनिधींनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करावा यासाठीच त्यांची जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ आणि खासदार संदीपान भुमरे यांचाही सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.

“तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला, तुमच्यासाठी अनेकांशी दुष्मनी घेतली. आता तुम्ही मराठ्यांशी बेईमानी करत आहात. आम्ही जसे निवडून आणले, तसेच पाडूही शकतो,” असा इशारा देत जरांगे यांनी भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी २५ ते ३० आमदार पराभूत करण्याची भाषा केली.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी “एकनाथ शिंदे डबल ढोलकी वाजवत आहेत. मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कट त्यांच्या सांगण्यावरून रचला जात आहे,” असा आरोप केला. तसेच, “आम्हाला उद्धव ठाकरे चांगले होते असे म्हणण्याची वेळ आणू नका,” असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र देऊनच संभाजीनगरमधील लोकप्रतिनिधींची जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही जरांगे यांनी केला. “राजकारणासाठी मराठा समाजाचे नुकसान करू नका. अन्यथा मराठा समाज सरकारचा माज उतरवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

21 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

21 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

2 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago