महाराष्ट्र

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी केली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण राज्यातील सर्वाधिक गाजलेल्या हत्याकांडांपैकी एक मानले जाते. गेली दोन दशके हा खटला सीबीआय न्यायालयात सुरू होता. या कालावधीत पीडित कुटुंबीयांसह जनतेलाही आरोपींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे. पीडित कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडला. या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.”

शिंदे यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून कायदेशीर लढाई पुढे सुरू राहील. “सत्य बाहेर यावे आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणात शिंदे यांनी घेतलेल्या सक्रिय भूमिकेमुळे पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून न्यायाच्या लढ्याला नवे बळ मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

39 मिनिटे ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

52 मिनिटे ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

54 मिनिटे ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

1 तास ago

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे…

1 तास ago

MIFF 2026 मधील मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी…

1 तास ago