महाराष्ट्र

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा अधिकार असून, राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील काही तरतुदी या मूळ कायद्याशी विसंगत आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या तरतुदी तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

सपकाळ यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सामान्य प्रशासन विभागाने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्राद्वारे माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील आणि माहिती पुरवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार वापरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होणार असून, कायद्याचा मूळ उद्देशच बाधित होईल.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, केंद्र सरकार आजही माहिती अधिकार अर्जासाठी केवळ १० रुपये शुल्क आकारते आणि अपिलांसाठी कोणतेही शुल्क घेत नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यामागील कारणे स्पष्ट केलेली नाहीत. माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(क) आणि ४(१)(ड) नुसार अशा निर्णयामागील कारणे, अभ्यास, आर्थिक विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ माहिती स्वतःहून जाहीर करणे बंधनकारक असतानाही तसे करण्यात आलेले नाही.

राजपत्रातील कलम ११(ग) चा उल्लेख करत सपकाळ यांनी म्हटले आहे की, अनिवार्य माहिती प्रसिद्ध करण्यात कसूर झाल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

याशिवाय, माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यात अर्जदाराला माहिती मागण्याचे “प्रयोजन” नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) शी स्पष्टपणे विसंगत असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. या कलमानुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीला माहिती का हवी आहे, याचे कारण देणे आवश्यक नसते.

काँग्रेसने सरकारकडे राजपत्रातील वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द करण्याची, “प्रयोजन” नमूद करण्याची अट काढून टाकण्यासाठी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्याची, तसेच शुल्कवाढीमागील सर्व कारणे व अभ्यास अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच, माहिती अधिकारांतर्गत स्वतःहून माहिती जाहीर न करणाऱ्या विभागप्रमुखांवर आतापर्यंत किती कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

18 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

1 दिवस ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago