महाराष्ट्र

१५०० कोटींचा जैवठेवा खासगीकडे? हाफकिनच्या निर्णयावर वडेट्टीवारांचा आक्षेप

मुंबई: हाफकिन संस्था कडे असलेला DPT लस तयार करण्यासाठीचा स्टेन हा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्तीचा ठेवा असल्याचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्षेप नोंदवला.

रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही सखोल विचारणा न करता हाफकिनने थेट Expression of Interest (EOI) मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.हाफकिनसारखी सक्षम संस्था स्वतः लस उत्पादन करू शकत असताना, तब्बल १५०० कोटी रुपयांचा मौल्यवान जैवठेवा खाजगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, हाफकिन संस्था आजपर्यंत सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात लसी उपलब्ध करून देत आली आहे. मात्र, जर हा ठेवा खासगी कंपनीकडे गेला, तर लसींचे दर वाढण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो.

राज्याच्या महत्त्वाच्या जैव-संपत्तीवर खाजगी नियंत्रण येणे हा धोक्याचा इशारा असल्याचे सांगत, ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी त्यांनी केली.तसेच, हाफकिन संस्थेला स्वतःचे लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन व प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मांडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago