महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण सरकारने विशेष शोध मोहीम राबवावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.

ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत १० वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यापैकी केवळ २ मुलींचा तपास लागला असून ४ मुली अजूनही बेपत्ता आहेत.सरकार सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत? मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा काय करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करण्याची गरज असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात अवकाळी आणि गारपीट झाली. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर वरील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील स्थिती अत्यंत गंभीर आहे. या नैसर्गिक आपत्तीत ४१ जनावरे दगावली असून २ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ कर्जमाफीच्या पोकळ गप्पा मारत आहे. अद्याप अनेक ठिकाणी पंचनामेही सुरू झालेले नाहीत. सरकारने तात्काळ निवेदन करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्यात शेतकरी मरत आहे, मुली सुरक्षित नाहीत, पण सरकार मात्र भोंदू बाबांच्या मागे धावण्यात धन्यता मानत आहे. पालकांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का?असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago