महाराष्ट्र

प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून मविआच्या या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार

जाती जणगणनना करणार

300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत

दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार

महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार

2.5 लाख नोकरभरती करणार

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार

सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन

अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार

बार्टी, महाज्योती, सारथी मार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार

एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार

महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार

महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार

महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु

शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार

महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार

बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार

कंत्राटी नोकरभरती बंद करणार

महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार

शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार

जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार

वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार

युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार

महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार

महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार

महिलांचा बस प्रवास मोफत करणार

सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार

जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

17 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago