मोबाईलवरील अश्लील व्हिडिओंचा परिणाम? धक्कादायक घटनेने समाजात संताप
अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय मामेभावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडीचा १७ मार्च रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याची नोंद सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या पथकाने संशयितांवर लक्ष केंद्रित केले. मृत्यूनंतर पीडितेचा १५ वर्षीय मामेभाऊ संशयास्पद वर्तन करत असल्याचे लक्षात आले. त्याने तीन दिवस अन्न न घेणे आणि सतत रडणे यामुळे पोलिसांना संशय आला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
प्राथमिक तपासात आरोपीने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मोबाईलवरील अशा प्रकारच्या अनियंत्रित सामग्रीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
समाजासाठी इशारा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, त्यांच्या वर्तनातील बदल ओळखणे आणि योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…