महाराष्ट्र

या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील

ठाणे: या वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यात स्वमलकीच्या तब्बल २६४० नव्या बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल! असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना बोलत होते.

स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा ” मास्टर प्लॅन” आपण बनवीत असून टप्प्याटप्प्याने एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल. त्याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे! त्यांच्या गणवेशापासून ते विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावला पाहिजे! तरच आपण प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतो. असे ते म्हणाले.

बहुप्रतीक्षित एसटीच्या स्वमालकीच्या नवीन लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होत असून आज १७ बसेसचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत १५० लाल परी बसेस येणार असून त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील आगारांना देण्यात येतील त्यानंतर दर महिन्याला ३०० एसटी बसेस दाखल होणार असून राज्यभरातील सर्व आगारांना या बसेस मिळतील अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

१०० खाटांचे अद्यावत दवाखाना उभारणार..

एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बोरीवली येथे शंभर खटांचा अद्यावत दवाखाना उभारण्यात येईल जेथे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एसटी कर्मचाऱ्यांना मिळतील अशी यंत्रणा निर्माण करण्यात येणार येईल. अशी घोषणा मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

27 मिनिटे ago

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

3 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

4 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

4 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

5 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

22 तास ago