मुख्य बातम्या

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या उद्देशाने उरळगाव (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (दि. ४) रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत झालेल्या या प्रशिक्षणाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिरुर तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संकेत मोरे तसेच डिजिटल शेती तज्ज्ञ विजय सांगळे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

शेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, पिकांवरील विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव तसेच बाजारपेठेतील बदलते चित्र या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. यासाठी योग्य पीक निवड, उपलब्ध पाण्याचे नियोजन, जमिनीची सुपीकता, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर याबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल…

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये अचूक नियोजन कसे करता येईल, आधुनिक साधनांचा वापर करून शेतीचा वेळ व खर्च कसा कमी करता येईल, तसेच उपलब्ध तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतीमध्ये कसा उपयोग करावा, याबाबत डिजिटल शेती तज्ज्ञ विजय सांगळे यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामान, पीक व्यवस्थापन, बाजारपेठ आणि शेतीविषयक विविध माहिती वेळेवर मिळण्यास मदत होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सायंकाळच्या वेळेत प्रशिक्षण…

शेतकऱ्यांची दिवसभरातील शेतीची कामे लक्षात घेऊन कृषी विभागाने सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत प्रशिक्षणाचे आयोजन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपून प्रशिक्षणात सहभागी होता आले. या उपक्रमाला उरळगावातील प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, चेअरमन तसेच महिला भगिनींचीही उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, उपकृषी अधिकारी शिवाजी गोरे, सहायक कृषी अधिकारी अक्षय थोरात यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक कृषी अधिकारी जयवंत भगत, आत्मा समिती सदस्य संतोष जाधव, राजेंद्र गिरमकर, कैलास सात्रस, पोलीस पाटील सागर गिरमकर, भीमराव कुदळे, संदीप बांडे, आकाश सात्रस, ऋषिकेश गिरमकर, तेजस सात्रस, राजेंद्र सात्रस, अर्जुन काळे, पोपट कुदळे, तुकाराम हांडे, सोमनाथ गिरमकर, सरडसर विद्युत मंडळाचे जाधव साहेब, नामदेव पांचदुकर, अविनाश सात्रस, तन्मय सात्रस, भाऊसाहेब कोकडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी केले. तर राजेंद्र गिरमकर यांनी आभार मानले. या प्रशिक्षणामुळे उरळगावातील शेतकऱ्यांना आधुनिक पीक व्यवस्थापन आणि डिजिटल शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून, पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

9 मिनिटे ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 मिनिटे ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 मिनिटे ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

28 मिनिटे ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

31 मिनिटे ago

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

4 तास ago