महाराष्ट्र

त्या सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा

मुंबई: उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत असलेल्या अधीक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावे अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाहीत. जेवणाची व्यवस्थित सोय नाही. राहण्यासाठी योग्य खोली नाही अशा अनेक गोष्टी समोर आले आहेत. यामुलींना स्थानिक अधिकाऱ्यांकडून वागणूक देखील व्यवस्थित मिळत नसल्याचे माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.या व अशा ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्याबाबतीत व्यवस्थित वागणूक मिळावी याकरिता उप सभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री,महिला व बालविकास विभाग यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

उल्हासनगर निरिक्षणगृह येथे सध्या कार्यरत असलेल्या अधीक्षक व तेथील कर्मचारी व सेवक यांच्यावर कारवाई करून तेथून त्यांना तात्काळ दूर करावे. राज्यातील विशेषगृह अधीक्षकाचे पद हे जाहिरात काढून ठराविक काळासाठी भरणे आणि एकाच व्यक्तीची तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणत्याही परिस्थितीत नेमणूक न करता पदावरील व्यक्ती नामनिर्देशनाद्वारे बदलावेत. विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलण्यात यावेत.

निरीक्षण गृहातील मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे आहे. त्याचबरोबर मुली व महिला पीडित व आरोपी वरील कोर्ट केसेस जलद गतीने चालवून निकाली काढाव्यात एका खोलीत मुलींची संख्या क्षमता ठरविणे, मुलींचे जगणे दर्जात्मक करणे, स्वच्छतागृहे व झोपण्यासाठी चांगले बिछाने,गाद्या व चादरी पुरविण्याच्या सूचना संबंधीतीत अधिकारी यांना तात्काळ देण्याची सोय करावी या प्रमुख मागण्यांचा समावेश विधान परिषद उपसभापती डॉ.गोर्हे यांच्या पत्रात करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

39 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

43 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

50 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

54 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago